बीजिंग : वृत्तसंस्था
सहा वर्षांपूर्वी कोरोना आणि आता ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गामुळे चर्चेत असलेले चीन यावेळी तंत्रज्ञानाच्या अद्भूत गोष्टीसाठी चर्चेत आहे. एखाद्या रेल्वे मार्गात जर कोणतीही मोठी स्थावर इमारत असेल, तर एकतर ती इमारत पाडली जाते किंवा रेल्वेचा मार्ग बदलला जातो. मात्र, चीनच्या ‘झियामेन’ शहरात बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गात अडथळा निर्माण करणारे अख्खे ५ मजली आणि ३० हजार टन वजनाचे बस स्थानक ढकलत नेऊन दुस-या ठिकाणी स्थानांतरीत करण्यात आली. ही अद्भूतकामगिरी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आली.
असे आहे बस स्थानक…
– हे बस स्थानक २०१५ मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले होते. दोन मजले जमिनीखाली व तीन मजले वर असे ५ मजली टर्मिनल आहे.
– २६० युआन म्हणजे ३० दशलक्ष पौंड खर्च करून ५ वर्षात या बस स्थानकाचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे वजन ३०,००० टन म्हणजे १५० बोइंग विमानाएवढे आहे. बस स्थानक ५३१ फूट लांब व ११० फूट रूंद आहे.
१० दशलक्ष डॉलरची बचत
– इमारत ढकलण्यासाठी रोलिंग ट्रॅक लावण्यात आले.
– हायड्रोलिक जॅक दररोज १० ते २० मीटर इमारत पुढे सरकवित होते.
– ४० दिवसाच्या कामानंतर अख्खी इमारत ९० अंशाच्या काटकोनात ९४५ फूट सरकविण्यात आली व बुलेट ट्रेनचा मार्ग प्रशस्त करण्यात आला.
– यामुळे वेळ वाचला आणि १० दशलक्ष डॉलरचा खर्च वाचविण्यात यश आले.