लातूर : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त लातूर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातील ज्ञानेश्वर विद्यालयात दि. ९ जानेवारी रोजी गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजय मलवाडे होते. स्पर्धेचे उद्घाटन एकमतचे वरिष्ठ उपसंपादक एजाज शेख यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक माधव क्षीरसागर हे होते. या वेळी बोलताना एजाज शेख म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकासासाठी शालेय जीवनातील जडण घडण अत्यंत महत्वाची आहे.
सहशालेय उपक्रम विद्यार्थीच्या विकासात महत्वाची भूमिका निभावतात. यावेळी माधव क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य मलवाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमास पर्यवेक्षक हणमंत बैनगिरे, पूनम पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख माया अनिगुंटे, संगीत विभागाचे प्रमुख गोविंद शेळके, हरीश कुलकर्णी, दीपक गायकवाड, समाधान बुरगे, ज्ञानेश्वर बेंबडे, आकाश सावंत तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी बळीराम कोले, श्रीधर गुरमे, जगदीश नमनगे, भाऊसाहेब उमाटे, चंद्रहंस कुचेकर, यशवंत गवळी, श्रीमती आयलाने व श्रीमती मुरकुटे यांनी सहकार्य केले.