22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रसाडेपाच लाख शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीसाठी ५३५ कोटींची नुकसान भरपाई !

साडेपाच लाख शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीसाठी ५३५ कोटींची नुकसान भरपाई !

दोन वर्षांपासून प्रलंबित होती रक्कम

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)-नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील ५ लाख ३० हजार ४५ शेतक-यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज दिली.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले होते पण निवडणूक आचारसंहिता आणि सरकार स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यामुळे शेतक-यांना मदत मिळत नव्हती त्यामुळे शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला होता राज्य सरकारने शेतक-यांना मदत जाहीर केली आहे. रक्कम संबधित शेतक-यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८९ शेतक-यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ६४८ शेतक-यांना १२१ कोटी ६४ लाख रुपये, बीड जिल्ह्यातील ३९ हजार ९३ शेतक-यांना ३० कोटी २२ लाख रुपये, छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ६१९ शेतक-यांना ३ कोटी २३ लाख, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार ४०८ शेतक-यांना १ कोटी ६३ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील १ हजार ८८६ शेतक-यांना १ कोटी ५८ लाख ७० रुपये, जालना जिल्ह्यातील १ हजार ५९० शेतक-यांना १ कोटी ५७ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील ३४२ शेतक-यांना ३२ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ हजार ३२१ शेतक-यांना ३५ कोटी ८७ लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार १३ शेतक-यांना ४ कोटी २५ लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील ५२२ शेतक-यांना ५२ लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील ३९० शेतक-यांना ३२ लाख ७४ रुपये आणि सातारा जिल्ह्यातील २७ शेतक-यांना १ लाख रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे.

मार्च २०२३ पासून रक्कम प्रलंबित

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च २०२३ पासून ९ हजार ३०७ कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतक-यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR