25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका

कराड अद्याप मकोका बाहेर

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी जारी केली.

देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर यापूर्वी देखील वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान यातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची माहिती मागवली जातेय. हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जातेय. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे असे सहाही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाईसाठी प्रशासनाच्या हालचालीला आता वेग आला आहे.

मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षांत दहा गुन्हे
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलिस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर २०१९ मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.

महेश केदार ५ गुन्हे
महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

जयराम चाटे ३ गुन्हे
जयराम माणिक चाटे हा २१ वर्षाचा असून त्याच्यावर २०२२ ते २४ या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलिस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

प्रतिक घुले ५ गुन्हे
प्रतिक भीमराव घुले हा २४ वर्षाचा तरुण असून त्याच्यावर २०१७ ते २४ या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

कृष्णा आंधळे ६ गुन्हे
या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून २०२० ते २४ या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात २०२४ मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे.

सुधीर सांगळे १ गुन्हा
तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR