19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeलातूरआज तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

आज तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर यांच्या मार्फत राज्यस्तरीय तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता भालचंद्र ब्लड बँक, गांधी मार्केट, लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सुप्रसिध्द साहित्यिका लेखिका मलेका महेबूब शेख-सय्यद तर स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक इस्माईल शेख आहेत. अशी माहिती संस्थेचे जिल्हाध्यक्ष तहेसीन सय्यद व केंद्रिय अध्यक्ष अ‍ॅड. हाशम पटेल यांनी दिली.

भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख करणार असून खासदार डॉ. शिवाजी काळगे, प्राचार्य नागोराव कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मोईज शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक मा. फ. म. शहाजिंदे, अँड. हाशम पटेल, प्रा. मैनोद्दीन मुल्ला, संस्थापक कवी शेख शफी बोल्डेकर, कवयित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजा बागवान , डॉ. सय्यद जब्बार पटेल, अय्युब नल्लामंदू, डॉ. इ. जा. तांबोळी, माजी संमेलनाध्यक्षा डॉ. अर्जिनबी युसूफ शेख, इंतेखाब फराश, अफसर शेख, डाँ. एहसानुल्ला कादरी, प्रा. फारूख तांबोळी, मुहंमद युनूस पटेल, डॉ. सुरैय्या जहागीरदार, डॉ. दुष्यंत कटारे, विलास सिंदगीकर, डॉ. महंमद रफी शेख, डॉ. नंदकुमार माने, जाफरसाहाब शेख आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण संमेलनाच्या दुसरे सत्रात परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचा विषय वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका हा असून या सत्राचे अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव आहेत. यात रामराजे आत्राम, नसीम जमादार, मुतवल्ली मैजोद्दीन एम., नौशाद उस्मान हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. ज्येष्ठ कवी बा ह. मगदूम पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन आदि कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. संमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्राचार्य डॉ दुष्यंत कटारे, संमेलनाचे अध्यक्ष,स्वागताध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष कवी शफी बोल्डेकर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR