अमरावती : प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्रात जातपंचायती अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण अमरावतीत पाहायला मिळाले. जातपंचायतीमुळे एका कुटुंबाला समाजापासून बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात जातपंचायती अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण अमरावतीत पाहायला मिळाले.
जातपंचायतीमुळे एका कुटुंबाला समाजापासून बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिष्कृत झालेल्या युवकाचे त्याच्याच जातीतील मुलीशी प्रेम झाले. लग्नाला नकार दिल्याने त्या मुलीने अमरावती येथील जात पंचायतकडे तक्रार केली आणि पंचायतीने करण चव्हाण याच्या कुटुंबाला बहिष्कृत केले असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
१० व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती शहरातील गाडी लोहार समाजाच्या जातपंचायतीने करण चव्हाण यांच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले. तब्बल दीड वर्षापासून हे कुटुंब समाजापासून बहिष्कृत राहिले. याविरोधात महिलेने गाडगेनगर पोलिस स्टेशन गाठून तेथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची चौकशी करून जात पंचायत प्रमुखासह १० व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.