22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरजाधव, राऊळ यांच्यावरील कारवाईचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

जाधव, राऊळ यांच्यावरील कारवाईचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

सोलापूर : ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्याची तयारी करण्यास व अभिवादन करण्यास प्रशासकीय अधिकारी शैलेंद्रसिंह मिठुलाल जाधव व वरिष्ठ सहाय्यक हरीप्रसाद राऊळ यानी नकार दिला व शासन निर्णय असेल तरच आम्ही करु असे सांगितले, यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारीवर्ग संतप्त व प्रक्षोभित झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान करणाऱ्या शैलेंद्रसिंह जाधव आणि हरिप्रसाद राऊळ यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी अधिष्ठाता, डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविदयालय,सोलापूर यांना देण्यात आले होते.

त्या संबंधाने डॉ. संजीव ठाकूर यांनी त्रिसदस्यीय चौकशी समीती गठीत केली होती. या चौकशी समीतीने सखोल चौकशी करून सर्व उपलब्ध पुरावे विचारात घेऊन सदर प्रकारात प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक दोषी असलेबाबत अहवाल दिला आहे.

सदर प्रकरणामध्ये दोषी ठरविण्यात आलेले. शैलेन्द्रसिंग जाधव कार्यालयीन अधिक्षक तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी आणि हरिप्रसाद राऊळ, वरिष्ठ सहाय्यक, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूर यांची प्रतिष्ठित संस्थेमधून बदली करण्याबाबत पुढील कार्यवाहीस्तव आयुक्त,वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई आणि मा सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय, मुंबई यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल दिनांक १३/१२/२०२४ रोजी दोहोंची बदली करण्याबाबतचे गोपनीय पत्र पाठवले आहे.

अद्याप महिना होत आला तरी सुद्धा समीतीने दोषी धरलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यास होत असलेल्या विलंबामुळे विभागाचे आयुक्त कारवाई करतात की पाठीशी घालतात हे बघणे औसुक्याचे आहे. कारवाईचा चेंडू सद्यस्थितीत आयुक्तांच्या कोर्टात आहे. सोबतच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे सद‌रची बाब किती गांभीर्याने घेतात हे ही पहावे लागेल.

आंबेडकरी अनुयायांच्या भावना तीव्र आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्याची तयारी करण्यास व अभि‌वादन करण्यास नकार दिल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी शैलेंद्रसिंह जाधव व वरिष्ठ सहाय्यक हरिप्रसाद राऊळ हे दोषी सिध्द झाल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित तर करण्यात यावेच, सोबत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. असे सोलापूर बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR