23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअखेर ‘मेटा’ने मागितली माफी; झुकरबर्गने केलेला दावा चुकीचा

अखेर ‘मेटा’ने मागितली माफी; झुकरबर्गने केलेला दावा चुकीचा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग याने अखेर भारताची माफी मागितली आहे. झुकरबर्गने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, २०२४ हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेले होते. कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली.

मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीविरोधात संसदीय समितीने मेटाला समन्स बजावले होते. त्यानंतर आता मेटाने माफी मागितली आहे. मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, २०२४ च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्कचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, परंतु भारतासाठी नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. मेटासाठी भारत हा अतिशय महत्वाचा देश आहे.

आयटी आणि कम्युनिकेशन प्रकरणांवरील संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. दुबे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, भारतीय संसद आणि सरकारवर १४० कोटी लोकांचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास आहे. मेटा इंडियाच्या अधिका-याने आपल्या चुकांसाठी अखेर माफी मागितली आहे. हा विजय भारतातील सामान्य नागरिकांचा आहे. पंतप्रधान मोदींना तिस-यांदा पंतप्रधान बनवून जनतेने देशाच्या कणखर नेतृत्वाची ओळख करून दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR