नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोबाइल सीम कार्ड बनावट कागदपत्रांनी घेण्याचा प्रकारास आता आळा बसणार आहे. सीम कार्डमुळे वाढलेल्या फसवणुकीच्या घटना पाहून पंतप्रधान कार्यालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन सीम कार्ड खरेदीसाठी आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचे असणार आहे. त्यामुळे मोबाइल कनेक्शनचे वाढते गैरप्रकार रोखले जाणार आहे. बनावट कनेक्शन फसवणूक किंवा गुन्हेगारी करण्यासाठीच घेतले जातात.
नवीन मोबाइल कनेक्शनसाठी पूर्वी सरकारी ओळखपत्रे लागत होते. त्यामुळे मतदान कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना अशा कोणत्याही कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन मिळत होते. परंतु ही बनावट कागदपत्रे तयार करून सीम कार्ड घेतले जात होते. परंतु नवीन नियमाप्रमाणे सीम कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. कोणत्याही विक्रेत्यास या पद्धतीनेच सीम कार्डची विक्री करता येणार आहे.
एआय टूलचा वापर करण्याचे निर्देश
पंतप्रधान कार्यालयाने दूरसंचार विभागाला कायदेशीर तपास संस्थांबरोबर काम करण्याचे म्हटले आहे. गुन्हेगारांची ओळख आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी एआय टूलचा वापर करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाला दिले आहेत. खोटी कागदपत्रे स्वीकारून सीम कार्ड देणा-या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन सीम कार्ड मिळविण्यासाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी ही आता एक नॉन-निगोशिएबल असणार आहे.