27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रडोक्यावर गोळी झाडून पोलिस हवालदाराची आत्महत्या

डोक्यावर गोळी झाडून पोलिस हवालदाराची आत्महत्या

बदली झाल्याने होते तणावात

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी एओपी येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराने स्वत:च्या डोक्यात बंदूकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जयराम पोरेटी (४८) असे गोळी झाडून आत्महत्या करणा-या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

जयराम कोरेटी हे देवरी तालुक्यातील मिसपिरी येथील रहिवासी आहेत. ते २००१ च्या बॅच मध्ये पोलिस खात्यात नोकरीला लागले. सुरुवातीला बराच काळ त्यांनी सी ६० येथे नोकरी केली. त्यानंतर त्यांची बदली नवेगावबांध पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या धाबेपवनी एओपीमध्ये झाली होती. पण काही दिवसांपूर्वीच त्यांची पोलिस विभागाद्वारे तिरोडा येथे बदली झाली होती. अद्याप ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. धाबेपवनी एओपी येथून तिरोडा येथे बदली झाल्याने ते काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती आहे. गुरुवारी (दि.१६) ते धाबेवपवनी एओपी येथून रिलिव्ह होण्यासाठी गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पण तिथे गेल्यावर कर्तव्यावर असतानाच त्यांनी स्वत:जवळ असलेल्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे धाबेपवनी एओपीमध्ये काही वेळ खळबळ उडाली होती. दरम्यान एओपीच्या कर्मचा-यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

बदलीतच दडले आत्महत्येचे कारण
पोलिस हवालदार जयराम पोरेटी यांची प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख होती. त्यांचे कुटुंबीय देवरी येथे भाड्याच्या घरात राहतात. अशातच काही दिवसांपुर्वी एओपीतील एका अधिका-याने त्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली. यानंतर त्यांची बदली धाबेपवनी एओपीतून तिरोडा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली. बदली झाल्याने ते काही दिवसांपासून तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जाते. जयराम कोरेटी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. एक मुलगा शासकीय सेवेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR