17.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमोरक्कोजवळ बोट उलटली, ४० पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू

मोरक्कोजवळ बोट उलटली, ४० पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

८० प्रवाशांना स्पेनला घेऊन जाणारी एक बोट मोरक्कोजवळ उलटली, ज्यामध्ये ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० हून अधिक लोक बुडाले असल्याची माहिती दिली आहे.

मोरक्को अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी बोट उलटल्यानंतर ३६ जणांना वाचवलं होतं, जी बोट २ जानेवारी रोजी मॉरिटानियाहून ८६ प्रवाशांना घेऊन निघाली होती. त्यात ६६ पाकिस्तानी होते. वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओ हेलेना मालेनो यांनी एक्स वर सांगितलं की, बुडालेल्यांपैकी ४४ जण पाकिस्तानचे असल्याचं मानलं जात आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, मोरक्कोमधील त्यांचे दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. राबत (मोरोक्को) येथील आमच्या दूतावासाने आम्हाला कळवलं आहे की, मॉरिटानियाहून ८० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक आहेत, ती मोरक्कोमधील दखला बंदराजवळ उलटली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR