22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रशेतक-­यांवर अस्मानी संकट

शेतक-­यांवर अस्मानी संकट

ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

पुणे : प्रतिनिधी
राज्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती असल्याने बळिराजावर अस्मानी संकट ओढावल्याची भीती आहे.

दरम्यान, राज्यात कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण यामुळे हवामानात बदल होत असून ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पिकांसाठी पोषक थंडी नसल्याने तसेच सतत ढगाळ वातावरण असल्याने ज्वारी पिकावर मावा तसेच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची पाने सुकून पिवळी पडत आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शेतकरी संकटात
आधीच अवकाळी पावसामुळे झालेला नुकसान त्यातच आता रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. चार एकरमध्ये दरवर्षी १२० ते १२५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न होते. मात्र यंदा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लागवडीचाही खर्च देखील निघतो की नाही याची चिंता शेतक-­यांना सतावत आहे.

इतर पिकेसुद्धा धोक्यात
रोगांचा प्रादुर्भाव होऊन होत असलेल्या नुकसानीकडेही शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतक-­यांनी केली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारीबरोबरच हरभरा, गहू, मका या पिकांवरसुद्धा रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

मजूर मिळत नसल्याने कामे खोळंबली
जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आता नव्या अडचणीत सापडला आहे. शेतात तुरीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या आहेत, मात्र तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-याची मोठी अडचण झाली आहे. ठरलेल्या रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

तूर कापणीस खोळंबा
तालुक्यातील परिसरातील गावांमध्ये मजुरांचा शोध घेण्यासाठी पायपीट करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. शोधाशोध करूनही मजूर न मिळाल्याने शेतक-यावर स्वत:च तूर कापणी करण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच नुकसान होत असून पैसे खर्च करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतक-यांसमोर संकट उभे राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR