20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमहाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले

महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले

पर्यटकांची संख्या थेट निम्म्यावर

मेढा : प्रतिनिधी
महाबळेश्वर-पाचगणीमध्ये स्थानिक व्यावसायिक हे पर्यटकांना ‘अतिथी देवो भव’ समजून पर्यटकांचे उत्साहात स्वागत करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाचगणी-महाबळेश्वरमध्ये स्थानिक व्यावसायिक कमी झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर-पाचगणीची ओळख असून वर्षाकाठी महाबळेश्वरला १८ ते २० लाख पर्यटक भेट देत असतात. ही संख्या हळूहळू रोडावत असून अवघ्या साडेआठ लाखांवर यावर्षी ही संख्या आली आहे.

पर्यटकांची पसंती ही कोकणाकडील पर्यटन स्थळांना वाढू लागल्याने ही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दरवर्षी उन्हाळी- पावसाळी हंगामांसह दिवाळीच्या सुटीत महाबळेश्वर -पाचगणी पर्यटकांनी बहरलेले पाहायला मिळते.

नगर परिषदेकडील नोंदणीनुसार कोरोना प्रादुर्भावापूर्वी (२०२० पर्यंत) येथे १८ ते २० लाख पर्यटक येत होते. पुढील दोन वर्षांत पर्यटनावर मर्यादा होत्या. कोरोना पश्चात २०२३ मध्ये महाबळेश्वरला १६ लाख २४ हजार २१७ पर्यटकांनी भेट दिली. पूर्वीच्या तुलनेत ही घट चार लाखांची होती. नुकत्याच संपलेल्या २०२४ मध्ये आणखी घट होत हा आकडा ८ लाख ४८ हजार ५५५ वर आला आहे.

पर्यटकांची संख्या कमी होण्याची कारणे
गेल्या काही वर्षांत निवास हॉटेलसह विविध सुविधांच्या दरात महाबळेश्वर-पाचगणीत मोठी वाढ झाली आहे. येथे फिरताना विविध प्रकारचे स्थानिक करही पर्यटकांना अधिक प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे खिशाला परवडणा-या कोकणातील पर्यटन स्थळांना आता अधिक पसंती मिळू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR