18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeक्रीडामुंबईत ९ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

मुंबईत ९ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी
राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होत आहे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य/राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी अस्थापनांमध्ये काम करणा-या लिन नंबर धारक कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

इच्छुक कुस्तिगिरांनी ३० जानेवारी २०२५ पर्यंत कार्यक्रम शाखा, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकावणा-या कुस्तिगिरांना पोरितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

कामगार केसरी कुस्ती
कामगार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. ७५ हजार, द्वितीय रु. ५० हजार, तृतीय रु. ३५ हजार व उत्तेजनार्थ रु. २० हजार आहे. तर कुमार केसरी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ५१ हजार, द्वितीय रु. ३५ हजार, तृतीय रु. २० हजार व उत्तेजनार्थ रु. १० हजार आहे. तसेच विविध वजनी गटांत सामने होणार असून विजेत्यांना रु. १० हजार ते २५ हजारांची पारितोषिके दिली जातील.
जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR