नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने नव्या वर्षात लग्नाचा बार उडवून दिला आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणताही गाजावाजा न करता थेट लग्नाचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. नीरज चोप्रा याच्या याच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. नीरज चोप्राने रविवारी १९ जानेवारीला लग्नाचे तीन फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करतोय, या कॅप्शनसह फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांसोबत लग्नाची गोष्ट शेअर केली आहे. कोणताही गाजावाजा न करता त्याने लग्न उरकून घेतले आहे.