17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडामहिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकला खो-खो वर्ल्ड कप

महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकला खो-खो वर्ल्ड कप

नवी दिल्ली : दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघा पाठोपाठ पुरुष संघानेही जेतेपद पटकावले. महिला संघाने नेपाळला पराभूत करत पहिल्या खो खो वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावर त्यानंतर काही वेळातच पुरुष संघानेही खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत आपला रुबाब दाखवून दिला. महिला संघाप्रमाणे पुरुष संघाने एकही सामना न गमावता फायनल बाजी मारत खो खो वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली.

अंतिम सामन्यात नेपाळच्या संघाला ५४-३६ असे पराभूत करत फायनल मॅचसह पहिली वहिली वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. पुरुष संघाच्या या विजयामुळे खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत दुग्ध शर्करा योग अनुभवायला मिळाला. महिला आणि पुरुष संघांनी मिळून एक नवा इतिहास रचला. खो-खो वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने सुरुवातीपासून दमदार खेळ दाखवला. एका बाजूला पहिल्या फेरीत भारतीय संघाने २६ गुण आपल्या खात्यात जमा केल्या. दुस-या बाजूला नेपाळच्या संघाला त्यांनी खातेही उघडू दिले नाही. दुस-या राउंडमध्ये नेपाळच्या संघाने कमबॅकचा प्रयत्न करत १८ गुण आपल्या खात्यात जमा केले. पण तरीही भारतीय संघ ८ गुणांनी आघाडी कायम ठेवत यशस्वी ठरला. तिस-या टर्नमध्ये भारतीय संघाने एकदम झक्कास खेळ करत खात्यात ५० पेक्षा अधिक गुण जमा करत नेपाळला जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर काढले.

चौथ्या आणि अखेरच्या राउंडमध्ये आघाडी कायम राखत भारतीय पुरुष खो खो संघाने अंतिम लढतीत ५४-३६ असा विजय नोंदवत घरच्या मैदानात खेळवण्यात आलेली खो खो स्पर्धेतील पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दाखवली. साखळी फेरीतील लढतीनंतर दुस-यांदा भारत-नेपाळ हे दोन आमने सामने आले होते. भारतीय संघाने दुस-यांदा नेपाळला पराभूत करत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपल नाव कोरले. खो खो वर्ल्ड कप स्पर्धेतील पुरुष गटात एकूण २० संघ सहभागी झाले होते. यात भारतीय संघ विश्व विजेता ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR