21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयकोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या

कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी नराधम संजय रॉयला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी, आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी महिलेची हत्या करण्यात आली होती.
संपूर्ण देशाला हादरवणा-या या प्रकरणाचा निकाल सुनावणी सुरू झाल्यापासून ५९ दिवसांनी लागला. पश्चिम बंगालमधील लोकांचा आक्रोश पाहता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आलं. त्यानंतर आता सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवलं आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणानंतर आरोपीवर तातडीने कारवाई होत नसल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे डॉक्टरांनी देशव्यापी निषेध केला, पीडितेला न्याय द्यावा आणि महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील सर्व निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणारा कायदा करावा, अशी मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली होती.

बलात्कार करून गळा दाबून हत्या केली
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्याही करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आलं होतं. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते. पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR