17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरलग्नाच्या आमिषाने सेवानिवृत्त शिक्षिकेवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने सेवानिवृत्त शिक्षिकेवर अत्याचार

मोहोळ : लग्नाचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली. याबाबत सेवानिवृत्त पीडितेने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून याबाबत सुमित चंद्रकांत काळे (रा. वैष्णवी नगर, सैफूल, सोलापूर) याच्या विरोधात मोहोळ पोलिसात अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच वर्षापूर्वी पीडित महिला व संशयित आरोपी यांची व्हॉट्स अ‍ॅपद्वारे ओळख झाली. गेल्या पाच वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत आहेत. त्यातून सुमित याने माझा विश्वास संपादन केला. या ओळखीतून अनेक हॉटेल, पीडितेचे घर व कामाच्या ठिकाणी भेटत होते. तसेच लग्न करणार आहे असे सुमितने सांगितले.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मला लग्नाचे आमिष दाखवून त्याने हॉटेल रॉयल ईन मोहोळ व औरंगाबाद या ठिकाणी माझ्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्याने माझा विश्वास संपादन केला होता. वेळोवेळी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानुसार त्याने माझ्याकडून १२ हजार रुपये खर्च करण्यासाठी घेतले. तसेच, रेल्वेमध्ये नोकरी लागणार आहे असे सांगून सुमितने मला २,५०,००० रुपये मागितले. तेव्हा मी अंबरनाथ ठाणे अकाऊंटवरुन त्याच्या एसबीआय अकाऊंटवर मी त्याला दि. १० नोव्हेंबर २०१९ रोजी २,५०,००० रुपये पाठवले.

त्यानंतर अशाप्रकारे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याकडून पैशाची मागणी करून पैसे घेतले होते. त्यानंतर मी त्याला आपण लग्न कधी करायचे, माझे घेतलेले पैसे कधी देणार, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकेन, अशी धमकी देऊन मला शिवीगाळ केली. तेव्हा माझ्या लक्षात आले, की सुमित याने मला लग्नाचे आमिष दाखवून पैशाबाबत माझी फसवणूक करून माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आहेत, अशा आशयाची फिर्याद दिली आहे.

पीडितेचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून माझ्याकडून वारंवार पैशाची मागणी करून ते पैसे परत मागितले असता पैसे परत न देता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन कुटुंबाला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे म्हणून सुमित चंद्रकांत काळे (रा. वैष्णवी नगर, सैफूल, सोलापूर) याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR