किल्लारी : वार्ताहर
कर्नाटकातील भालकी येथे श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णकृती विटंबना प्रकरणी सोमवारी दि २० जानेवारी २०२५ रोजी औसा तालुक्यातील किल्लारी येथे सकल लिंगायत समाजाच्या वतीने किल्लारी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या आवाहनास व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.
किल्लारी पाटीवरील निळकंठेश्वर महाद्वार येथे सकाळी १० वाजता लिंगायत बांधव एकत्र आले. महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने घोषणा देत भालकी येथील घडलेल्या घटने प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला. येथे जमलेल्या बांधवांनी घेतलेला घटनेचा निषेध नोंदवला तसेच आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी गौरी गौरीशंकर बालकुंदे, संग्राम बिराजदार सिद्धेश्वर बालकुंदे, संदीप शिवनेरी , दिलीप लोव्हार अशोक गावकरे , गुंडाप्पा बालकुंदे ग्रा. प. सदस्य विजय माने ग्राप सदस्य शकर बिराजदार, सुरेश सावळगे, प्रमोद बिराजदार, सत्यम खजुरे, प्रशांत बिराजदार, पंकज बिराजदार, बिराजदार, विशाल उस्तुरे, लक्ष्मण कुंभार ,शंकर गावकरे आदी उपस्थित होते. यावेळी सपोनी विशाल शहाणे, पिएसआय अशोक ढोणे पिएसआय एस आर माने, पोहेको मरडे, पोहेकॉ गणेश यादव, आबासाहेब इंगळे, कृष्णा गायकवाड, रवी करके, बालाजी नटूरे यानी चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.