जयपूर : भारतात अॅपल कंपनीच्या आयफोन मोबाईलची खूप क्रेझ आहे. पूर्वी फक्त श्रीमंतांच्या हातात दिसणारा हा फोन, आता सर्वसामान्यांच्या हातातही दिसतोय. विशेष म्हणजे, गरीब व्यक्तीही हा फोन खरेदी करतोय. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर काही व्हीडीओ व्हायरल झाले होते, ज्यात कचरा वेचणारी महिला आणि भंगार गोळा करणा-या व्यक्तीकडे आयफोन पाहून नेटकरी चकीत झाले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.
राजस्थानच्या अजमेरमधील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ नेटक-यांना हसू आवरेना. याचे कारण म्हणजे, व्हीडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती बाजारात भीक मागताना दिसतोय. विशेष म्हणजे, त्याच्याजवळ आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. या भिका-याकडे चक्क अस्रस्र’ी चा सर्वात लेटेस्ट फोन आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, हा फोन त्याने ऑन कॅश १.५ लाख रुपये देऊन विकत घेतला.
आयफोन १६ प्रो प्लस गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १,४४,९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. हा अॅपलचा सर्वात लेटेस्ट फोन आहे.
एका भिका-याच्या हातात इतका महागडा फोन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ रोहित नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये एक व्यक्ती भिका-याला एवढा महागडा फोन कुठून आणला, हे विचारतो. यार तो भिकारी सांगतो की, त्याने भिक मागून हा फोन खरेदी केला. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही जो फोन ऑन कॅश घेत नाही, तो फोन या भिका-याने ऑन कॅश घेतल्यामुळे नेटकरी आवाक् झाले आहेत.