23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा

बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा

संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत नाहीत. त्यांनी हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला ताठ मानेने जगायला शिकवलं. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९९वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानाने जगायला शिकवले, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी सर्व राजकीय पदे सहका-यांना दिली होती. स्वत: कधीही कुठल्या पदावर आले नाहीत. बाळासाहेबांनी शिवसेनेत गट कधी तयार केला नाही. मार्केटमध्ये ब्रँडच्या काही डुप्लिकेट गोष्टी येतात, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे माहितीच नाहीत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून उभे राहण्याचे काम आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले. हातामध्ये सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसांसाठी संघर्ष केला. या देशात हिंदुत्वाच्या नावाने ढोंग सुरू. ढोंग करणा-यांना माझे आवाहन आहे, हे ढोंग बंद करा , असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

२०२६ला बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊ शकले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिला तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही गौरव ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.

पुन्हा एकदा २ शिवसेनेचे २ मेळावे
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज २ शिवसेनेचे २ मेळावे पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आज अंधेरीत मेळावा होणार आहे. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासह मुंबईतील बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात काय घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR