19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरलातूरच्या कच-यासाठी आता गुजरातच्या घंटागाड्या

लातूरच्या कच-यासाठी आता गुजरातच्या घंटागाड्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील घन कच-याच्या व्यवस्थापनासाठी नवीन कंत्राटदार नेमला. या नवीन कंत्राटदाराकडून शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरु आहे. ३०० कर्मचा-यांच्या मदतीने दररोज २०० टन कचरा उचलला जात आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होत असताना घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी थेट गुजरातच्या घंटागाड्या गल्लीबोळात फिरत आहेत.
लातूर शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन जनाधार संस्था करीत होती. परंतू, या संस्थेकडून शहरातील कच-याचे व्यवस्थापन निटपणाने होत नव्हते. त्यामुळे शहरात सर्वत्र कच-याचे ढिग दिसत असत. कच-याचे योग्य व्यवस्थापन करुन शहर कचरामुक्त करावा, शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे यासाठी नागरीकांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने जुन्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकुन नवीन कंत्राटदार तीन-चार महिन्यांपूर्वी नेमला. या नवीन कंत्राटदाराने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरु केले आहे. सुमारे ३०० कर्मचारी शहरातील २०० टन कचरा दररोज उचलत आहेत.
लातूर शहर महानगरपालिका व कंत्राटदाराच्या घंटागाड्या दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहेत. त्यासाठी १२५ घंटागाड्या आहेत. त्यापैकी ४२ घंटागाड्या महापालिकेच्या आहेत तर उर्वरीत ८३ घंटागाड्या कंत्राटदाराच्या आहेत. यातील ३० ते ३५ घंटागाड्यांवर गुजराती भाषेत मजकुर आहे. कचरा संकलन आणि त्याबाबत जनजागृती असाच तो मजकुर असेल, असा समज लातूरकरांचा असता तरी तो गुजराती भाषेत का लिहिला असेल, या प्रश्नाचे कोडे मात्र लातूरकरांना पडले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR