बोरी/प्रतिनिधी
बोरी पोलिस पथकाने कोक ते रोहीला पिंपरी जाणा-या रस्त्यावर करवली शिवारात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली. दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९ हायवा व १ पोकलेन मशीन असा ४ कोटी १८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी बोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरी पोलिसांच्या पथकाला करवली शिवारात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार बद्रीनाथ कंठाळे, कृष्णा शहाणे, प्रल्हाद राठोड, सिद्धार्थ कोकाटे, दिलावर पठाण, पांडुरंग तूपसंदर, श्रीराम दंडवते, शेख मोबीन यांच्या पथकाने करवली शिवारात धाड टाकली. यावेळी त्यांचा परवाना एका ठिकाणचा आणि उत्खनन दुस-या ठिकाणी होत असल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी ९ हायवा, १ पोकलेन मशीन असा ४ कोटी १८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी काही संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आलेल्या हायवेच्या तपासणीसाठी आरटीओने वाहने नेले आहेत. पुढील कारवाई चालू आहे.