मुखेड : प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील जांब-दिग्रस रस्त्यावर पिकअप जिप व दुचाकीचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवार दि. २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील जांब बु.-दिग्रस बुद्रुक या रस्त्यावर पिकअप व्हॅन व दुचाकीची जब्बर धडक होऊन अपघात झाला. यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील सचिन रमेश जाधव वय ३२ यांचा व त्यांच्यासोबत असलेल्या दुस-या एका व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वृत लिहीपर्यंत अपघातात मृत्यु झालेल्या दुस-या व्यक्तीचे अद्याप नाव समजले नाही. घटनेची माहिती मुखेड ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मंचक फड, एएसआय पी.आर. राठोड,पोकॉ गणेश वनामे यांनी घटनास्थळी जाऊन मृत्यु झालेल्या दोघांचे पार्थिव उपजिल्हा रूग्णालय येथे पाठवले. मयत हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे वाहनाच्या नोंदणीवरून व एका मृत व्यक्तीची ओळख पटल्यावरुन समजले. घटनेची माहिती अपघातातील मयत सचिन जाधव यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी मुखेड गाठले.