24 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeराष्ट्रीयरहस्यमयी तापाने आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

रहस्यमयी तापाने आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मिरात भीतीचे वातावरण ताप येताच बेशुद्ध पडतायेत रुग्ण

राजौरी : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये एक रहस्यमय आजाराची मोठी भीती निर्माण झाली आहे. या आजाराने आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आजार काय आहे हे कुणालाही माहीत नाही. या आजाराचे रहस्य निर्माण झालेले आहे. लोक सातत्याने आजारी पडत आहेत. लहान मुले असो की बुजुर्ग प्रत्येकजण या आजाराच्या तडाख्यात सापडला आहे. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की बडाल गावात कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. गावात ४४ दिवसात तीन कुटुंबातील १७ लोकांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हाहा:कार उडाला आहे. तर पाच लोक अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना प्रचंड ताप येत आहे. श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. तसेच हे लोक बेशुद्ध पडतानाही दिसत आहे. ताप येताच बेशुद्ध होण्याचं प्रमाण अधिक वाढले आहे. मोहम्मद फजल नावाच्या एका व्यक्तीचा ७ डिसेंबर रोजी या रहस्यमय आजाराने मृत्यू झाला. त्याच्या मेव्हणीच्या तीन मुलींची प्रकृतीही बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी जम्मूत रेफर करण्यात आले आहे. बडाल गावातील परिस्थिती पाहून या ठिकाणी क्वॉॅरंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहेत. त्यात ६० लोकांना ठेवण्यात आले आहे.

जीएमसी मेडिकल कॉलेजचे सुप्रीटेंडंट डॉ. शमीम अहमद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यापासून गावातील तीन कुटुंबांतील १७ लोकांना रहस्यमयी आजार झाला आहे, त्यात सहा लहान मुलेही समाविष्ट आहेत. लोक सतत या रोगाची शिकार होत आहेत. सुरुवातीला ५ जणांना सीएचसी कंडीमध्ये दाखल केले गेले होते, त्यापैकी गंभीरपणे आजारी असलेल्या आजाज खानला हेलिकॉप्टरमधून बुधवारी पीजीआय चंदीगडमध्ये रेफर करण्यात आले आहे. त्याच्या तीन लहान बहिणी जीएमसी राजौरीमध्ये रेफर केल्या गेल्या आहेत. त्यांना सेनेच्या हेलिकॉप्टरने जम्मूमध्ये एयरलिफ्ट केले. पाचव्या रुग्णाला सीएचसी कंडीकडून जीएमसी राजौरीला पाठवण्यात आले.

कुठे कुठे कंटेनमेंट झोन?
पहिला कंटेनमेंट झोन : ज्यांच्या घरात मृत्यू झाले आहेत, अशा घरांसाठी हा कंटन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. या घरांना पूर्णपणे सील केले गेले आहे आणि या ठिकाणी प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या घरात राहणा-या लोकांना कुठेही जाण्यापूर्वी अधिका-यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

दुसरा कंटेनमेंट झोन : या रहस्यमयी आजाराने बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना या झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. या लोकांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवले गेले आहे आणि त्यांची आरोग्य स्थिती डॉक्टर्सकडून सतत तपासली जात आहे.

तिसरा कंटेनमेंट झोन : या झोनमध्ये गावातील सर्व कुटुंबांना ठेवले गेले आहे. त्यांचा आहार आणि पाणी यावर मेडिकल स्टाफ सतत लक्ष ठेवून आहे. या कुटुंबांना आहार-पाणी पुरवण्याची जबाबदारी मेडिकल स्टाफवर आहे आणि पोलिसांद्वारे यावर देखरेख केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR