23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeराष्ट्रीयट्रम्प यांचा मोदींना पहिल्यांदाच फोन

ट्रम्प यांचा मोदींना पहिल्यांदाच फोन

जगात खळबळ उडवून दिलेल्या आदेशावर केले सावध पुढील महिन्यात मोदी अमेरिका दौ-यावर

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याने दोन्ही देशांमधील संबंधांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यात ट्रम्प यांच्या एका आदेशामुळेही जगभरातील अनेक देशांचे टेन्शन वाढले आहे. या विषयावरही ट्रम्प यांनी मोदींशी संवाद साधला आहे.

दोन्ही नेत्यांचा फोनवरून संवाद झाल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या फेब्रुवारी महिन्यातील अमेरिका दौ-याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांची पुढील काही दिवसांत भेट होणार हे निश्चित मानले जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल.
ट्रम्प यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणा-या इतर देशांतील नागरिकांना परत पाठवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भारतातील अनेक नागरिक सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा मुद्दाही ट्रम्प यांनी मोदींशी बोलताना उपस्थित केला. बेकायदेशी नागरिकांना परत घेण्याबाबत भारत योग्य पावले उचलेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या मोहिमेतील हा महत्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीदरम्यानच त्यांनी हे आश्वासन दिले होते. त्यासाठी ट्रम्प यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या दोन लष्करी विमानांतून रविवारी कोलंबियातील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले होते. पण या देशाने विमानांना उतरण्यास परवानगी नाकारली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.

सरकारी अधिका-यांच्या प्रवासावर बंदीचा आदेश
अमेरिकेने लगेच कोलंबियावर २५ टक्के कर लादण्याचा आणि सरकारी अधिका-यांच्या प्रवासावर बंदीचा आदेश काढला. त्यानंतर मात्र, कोलंबिया सरकार नरमले आणि विमानांना उतरण्यास परवानगी दिली. अशी स्थिती इतर देशांबाबत उद्भवल्यास ट्रम्प यांच्याकडून कडक पावले उचलली जाऊ शकतात. मोदींशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या मुद्यावर चर्चा करत भारतालाही एकप्रकारे सावध केल्याचे मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR