25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरसोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करु नका

सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करु नका

लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरु केली आहेÞ त्यासाठी लातूर जिल्ह्यातील हजारो शेतक-यांनी नोंदणी केली आहेÞ परंतु, लातूर जिल्ह्याचा कोटा संपला या सबबीखाली पोर्टल बंद करण्यात आलेÞ. त्यामुळे नाफेडमार्फतची सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहेÞ. खरेदी केंद्रांवर आठ दिवसांपासून सोयाबीनची वाहने उभी आहेतÞ. वाहन भाड्याचा भुर्दंड शेतक-यांना बसतो आहेÞ त्यामुळे सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करु नये, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर तालुक्यातील नागझरी येथील विकास ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. च्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला २८ जानेवारी रोजी भेट दिली.  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, अनुप शेळके, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, लातूर बाजार समितीचे संचालक सुभाष घोडके, शेषराव हाके, विकास अ‍ॅग्रोचे विलास उफाडे आदीसह सोयाबीन  उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतक-यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्याकडे व्यथा मांडल्या.
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले, सरकारनेच नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचे जाहीर केलेÞ त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केलेÞ लातूर जिल्ह्यातील हजारो शेतक-यांनी जिल्ह्यातील नाफेडच्या ५४ केंद्रांवर नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतक-यांना ओटीपी मिळाला. ओटीपी मिळाल्यानंतर शेतकरी नाफेड केंद्रांवर सोयाबीनचे ट्रॅक्टर घेऊन  गेले. परंतू, सोयाबीन खरेदीचा लातूर जिल्ह्याचा कोटा संपला या सबबीखाली सरकारने पोर्टल बंद केले. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील सोयबीन खरेदी ठप्प झाली आहे.  नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांग  लागलेल्या आहेत. गेल्या आठ  दिवसांपासुन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. जागेवर उभ्या वाहनांना दिवसाला २ हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. सरकार शेतक-यांची पिळवणूक करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR