25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरमध्यवर्ती बसस्थानकातून सुटणा-या गाड्यांत बदल  

मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणा-या गाड्यांत बदल  

लातूर : प्रतिनिधी
राज्य परिवहन लातूर मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक १ येथील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम दि. २७ जानेवारीपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या बसस्थानकावरुन सुटणा-या काही बसेस आता बसस्थानक क्रमांक २ व ३ वरुन सुटणार आहेत, लातूर विभाग नियंत्रक जानराव यांनी दिली आहे.
लातूर-नांदेड, नागपुर, अमरावती, अकोला व नांदेड मार्गावरील सर्व लांब पल्ल्याच्या बसेस. लातूर-उदगीर सर्व शटल व विना वाहक बसेस. लातूर-अहमदपूर सर्व शटल बसेस. लातूर-जळकोट, मुखेड, बिलोली, निजामाबाद व सदर मार्गांवरील सर्व लांब पल्ल्याच्या बसेस. मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक १ वरुनच सुटतील. नांदेड-लातूर मार्गे पुढे पुणे व सोलापूर मार्र्गावर जाणा-या सर्व बसेस महात्मा गांधी चौक येथून मध्यवर्ती बसस्थानकात न जाता छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बसस्थानक क्रमांक २ जुना रेणापूर नाका,
अंबाजोगाई रोड लातूर येथून प्रवाशी चढ-उतार करुन परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढील मार्गावर जातील. पुणे व सोलापूर मार्गावरुन येऊन पुढे नांदेड, उदगीर, मुखेड मार्गावर जाणा-या सर्व बसेस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बसस्थानक क्रमांक २, जुना रेणापूर नाका अंबाजोगाई रोड लातूर येथे जाऊन प्रवाशी चढ-उतार करतील व परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी येथून मध्यवर्ती बसस्थानकात न जाता गुळ मार्केट, विवेकानंद  चौक, गरुड चौक येथुन पुढील मार्गावर जातील.
जूने रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्थानक क्रमांक ३ येथून सुटणा-या बसेसमध्ये पूर्वी सुटणा-या सर्व ग्रामीण बसेस तेथूनच सूटतील. मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक १ येथूून छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, स्वामी विवेकानंद  चौक येथून नांदेड रोड मार्गावर जाणा-या सर्व ग्रामीण व रात्री वस्ती बसेस जुने रेल्वे स्टेशन बसस्थानक क्रमांक ३ येथून सुटून महात्मा गांधी चौक मार्गे मध्यवर्ती बसस्थानकात न जाता गुळ मार्केट, स्वामी विवेकानंद चौक, गरुड चौक मार्गे पुढे ममदारपूर, आष्टामोड मार्गे पुढे जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR