25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाची हॅट्ट्रिक हुकली

टीम इंडियाची हॅट्ट्रिक हुकली

राजकोट : वृत्तसंस्था
इंग्लंडने तिस-या टी-२० सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. बुधवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाहुण्यांनी २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. त्यामुळे या मालिकेत पहिला सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आले.

भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर इंग्लंड संघाने तिस-या सामन्यात शानदार पुनरागमन करत २६ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. या सामन्यासाठी इंग्लंडने आधीच त्यांची प्लेइंग ११ जाहीर केली होती. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७१ धावा केल्या. ज्यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक ५१ धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ५ तर हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. आता दोन्ही संघ शुक्रवारी (३१ जानेवारी) पुण्यात पुन्हा एकदा आमनेसामने येतील, ज्यामध्ये टीम इंडिया या मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR