23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंविरोधात पुरावे, राजीनामा द्यावा

धनंजय मुंडेंविरोधात पुरावे, राजीनामा द्यावा

- सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक, छगन भुजबळ हे केवळ ऐकीव माहितीच्या आधारे वर्षभर जेलमध्ये गेले. मात्र, धनंजय मुंडे यांच्या विरोधात दररोज पुरावे मिळत आहेत, अजून कोणते पुरावे हवे आहेत? असा हल्लाबोलही त्यांनी केला. मी त्या ठिकाणी असते तर राजीनामा दिला असता आणि नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा मागत असल्याचे त्या म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला तब्बल पन्नास दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही, एवढे तंत्रज्ञान उपलब्ध असताना, एआय उपलब्ध असताना आरोपी सापडत नाही, काय चेष्टा लावली आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.

संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरही विरोधकांकडून अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. त्यांचा बीड जिल्ह्यातील अत्यंत निकटवर्तीय खंडणीखोर वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पवनचक्की खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.

ओडिशा आणि छत्तीसगड आपल्या पुढे गेली
जी गोष्ट मी गेली अडीच वर्षे सांगत होते ते आज नीती आयोगाने मान्य केले आहे. आलेला आणि खर्च केलेला पैसा यातील अंतर किती याला फिसकल डेफीसीएट अ‍ॅक्ट आपल्याकडे आहे. जो अटलजींनी आणला होता. गेल्या दोन-तीन वर्षांत मी विचारतेय की केंद्र आणि राज्यातले नाते कसे आहे.. एखादे राज्य कितीही पैसे खर्च करू शकत नाही. ते दिवाळखोरीकडे जाऊ शकत नाही. आपण वित्तीय तुटीमध्ये ३ वरून ६व्या स्थानी गेलो आहोत. ओडिशा आणि छत्तीसगड हे आपल्या पुढे गेले असल्याचा टोला त्यांनी लगावला. इतर राज्ये पुढे जात आहेत मग महाराष्ट्र का मागे जात आहे याचा विचार केला गेला पाहिजे. हा अतिशय गंभीर विषय आहे की आपण मागे का जात आहोत, असे त्या म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR