20.5 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुरोपातील ५८ लाख लोक ग्लोबल वॉर्मिंगचे बळी ठरणार

युरोपातील ५८ लाख लोक ग्लोबल वॉर्मिंगचे बळी ठरणार

लंडन : वृत्तसंस्था
येत्या काळात ग्लोबल वॉर्मिंग अक्राळविक्राळ रूप धारण करणार असून, त्यामुळे एकट्या युरोपमध्ये ५८ लाख लोकांचा मृत्यू होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

संशोधनामधून वातावरणीय बदलांमुळे युरोपमध्ये किती लोकांचा या शतकाअखेरपर्यंत मृत्यू होऊ शकतो याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते २०१५ ते २०९९ या काळात तापमान वाढीचा थेट परिणाम होणार आहे. तसेच केवळ वाढत्या तापमानामुळे ५८ लाख लोकांचा मृत्यू होईल. हे संशोधन लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड टॉपिकल मेडिसीनच्या संशोधकांनी केले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या इशा-यानुसार हा आकडा केवळ वाढत्या तापमानामुळे होणा-या मृत्यूंचा आहे. त्यामध्ये आग, पूर, भूकंप, वादळ अशा सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा जोडला, तर तो अधिकच भयावह असेल. युरोपमधील बार्सिलोना येथे वाढत्या तापमानामुळे अधिक मृत्यू होतील, असेही या संशोधनामध्ये म्हटले आहे. त्यानंतर रोम, नेप्स आणि माद्रिद येथे मृत्यूचं तांडव होईल.

संशोधकांच्या मते युरोपमधील अवघ्या १० शहरांमध्येच २३ लाख लोकांचा मृत्यू होईल. म्हणजेच गाव-खेड्यांच्या तुलनेत शहरांमध्ये वातावरणीय बदलांमुळे अधिक मृत्यू होतील.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानाचा अर्थ थंडीमुळे होणा-या मृत्यूंमध्ये घट होईल असे नाही. संशोधकांनी सांगितलं की, वाढत्या तापमानामुळे होणा-या मृत्यूंचा आकडा हा थंडीमुळे होणा-या मृत्यूंपेक्षा अधिक असेल. जिथे ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन अधिक होत असेल, तिथे कार्बन उत्सर्जन अनुकूल बनले नाही तर केवळ युरोपमध्ये उष्णतेमुळे सुमारे ५८ लाख २५ हजार ७८६ अतिरिक्त मृत्यू होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR