27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रसैफ हल्ल्यात मोहम्मद शहजादच खरा आरोपी

सैफ हल्ल्यात मोहम्मद शहजादच खरा आरोपी

फेस रेकग्निशनमध्ये अहवाल पॉजिटिव्ह

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याचा फेस रेकग्निशन टेस्ट म्हणजेच एफआरटी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादचा सीसीटिव्हीतील चेहरा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींच्या वकिलांनीही त्यावर प्रश्न उपस्थित करत सीसीटिव्हीतील आरोपी मोहम्मद शहजाद नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता हा अहवाल समोर आल्यावर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. यानंतर पोलिस चौकशीत आपल्याला फसविले जात असल्याचे आरोपी मोहम्मदने म्हटले. आरोपीच्या कुटुंबियांनीही दावा केला की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला व्यक्ती एक नसून आरोपी वेगळाच आहे. यामुळे आरोपीचा चेहरा आणि सीसीटीव्हीत पळताना दिसलेल्या चोराचा चेहरा यांचं फेस रेकग्निशन करण्यात आला. आता त्याचा अहवाल समोर आला असून सीसीटीव्हीमध्ये पळणार चोर मोहम्मद शहजाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी १९ जानेवारी रोजी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. आरोपीचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असल्याचे तपासात समोर आले. इतकेच नाही, तर आरोपी बांगलादेशी नागरिक असून भारतात अवैधरित्या पोहोचल्याचे समोर आले.

नेमके काय घडले?
सैफवर चाकूहल्ला केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. आरोपी पाय-यांवरुन पळून जाताना त्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, ज्याच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास पुढे नेला आणि आरोपीला अटक केली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती शरीफुल आहे की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. काही लोकांनी तर असेही म्हटले की, अटक केलेली व्यक्ती आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी आहे. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनीही दावा केला की, त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे.

आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रेकग्निशन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आता एफआरटी अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. दरम्यान, आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला ११ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR