25.4 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख प्रकरणातील पुरावे सार्वजनिक करा

संतोष देशमुख प्रकरणातील पुरावे सार्वजनिक करा

मुंडे यांना दिलेला पाठिंबा ही सामाजिक बाब

अकोला : महाराष्ट्रात सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. तिथे होणा-या प्रत्येक घटनेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळीच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे जाहीर केले आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, भगवान गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा ही सामाजिक बाब आहे.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुरावे पोलिसांनी सार्वजनिक करावेत. असे केले तरच या संदर्भातील लोकांच्या मनातला संभ्रम दूर होणार आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या तरुण पिढीबद्दल चिंता व्यक्त करत भाष्य केले आहे. आजची पिढी विचार करत नसून ती आत्मकेंद्रित झाली आहे, असे विधान त्यांनी केले आहे. अकोला येथील सीताबाई कला, वाणिज्य आणि विद्यान महाविद्यालयात एका राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. भारतीय संविधान देशाच्या नवीनतम सर्वांगीण विकासाचा पाया असा या परिसंवादाचा विषय होता.

प्रकाश आंबेडकर यांनी या कार्यक्रमात बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिकेत ट्रॅम्प सरकारच्या धोरणांमुळे जवळपास २३ लाख भारतीयांना देशात परत यावे लागणार असल्याची भीती देखील प्रकाश आंबेकडर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. पुढे बोलताना प्रकाश आंबेकडर म्हणाले, ब्रह्मपुत्रा ही ईशान्येतील सेव्हन सिस्टर आणि वन ब्रदर यांना जोडणारी नदी आहे. मात्र याच नदीवर चीन सात धरणे बांधायची योजना आखत आहे. ही सात धरणे बांधली गेली तर ब्रह्मपुत्रेचे पाणी आपल्याला मिळणार नसल्याचे नाही. असे झाले तर ईशान्येतील सात राज्य चीनसोबत जाण्याचा विचार करू शकतात, अशीही चिंता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR