25.4 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeधाराशिवधनादेश अनादरीत प्रकरणी पाच लाखांचा दंड व तीन माहिने करावास

धनादेश अनादरीत प्रकरणी पाच लाखांचा दंड व तीन माहिने करावास

ऊसतोड वाहतुकीच्या करारापोटी घेतलेली रक्कम परत करण्यासाठी दिला होता धनादेश

धाराशिव : प्रतिनिधी
साखर कारखान्यासोबत ऊसतोड वाहतुकीचा करार करून त्यापोटी ४ लाख ५० हजार रूपये आगावू रक्कम उचल घेतली. मात्र, कराराप्रमाणे काम न केल्याने साखर कारखान्याने सदर ठेकेदाराकडून कराराची रक्कम परत मागितली. त्यापोटी आरोपीने कारखान्यास धनादेश दिला. मात्र, आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश वटला नाही. याप्रकरणी कारखान्याने दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयात हे प्रकरण चालले. यात मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी दत्तात्रय साठे यांनी धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस ३ महिने कारावास व ५ लाख रूपयांचा दंडासह ५ हजार रूपये खर्चाची शिक्षा ३० जानेवारी रोजी सुनावली.

संजय महादेव माने (रा. येवती) यांनी जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्टस प्रा. लि. नितळी यांचे सोबत ऊसतोड वाहतुकीचा करार केला. तसेच जयलक्ष्मी साखर कारखान्याकडून वसंतदादा बँकेतून ४ लाख ५० हजार रूपये आगाऊ उचल घेतली. रक्कम उचल घेऊन ही ऊसतोड वाहतूक करार करून जयलक्ष्मी कारखान्यास ऊस वाहतूक केली नाही. आणि जयलक्ष्मी साखर कारखान्यास अडचणीत आणले. त्यांनतर आरोपीकडे कराराप्रमाणे कारखान्याने काम न केल्याने रक्कम परत मागितली असता, आरोपीने जयलक्ष्मी साखर कारखान्यास ३ लाख ५० हजार रूपयांचा चेक साल २०१३ साली दिला व चेक वटवून रक्कम मिळेल अशी हमी दिली. सदर चेक वटण्यासाठी बँकेत जमा केला असता धनादेश खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने अनादरीत झाला. त्यानंतर धनादेश अनादरीत झाल्याने जयलक्ष्मी कारखान्याद्वारे सुरेश भोरे यांना न्यायालयीन कामासाठी नेमले व सुरेश भोरे यांनी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विजयकुमार शिंदे यांच्यातर्फे रक्कम मागणीची नोटीस आरोपीस दिली.

मात्र, आरोपीने जयलक्ष्मी कारखान्यास रक्कम परत न दिल्याने अ‍ॅड. विजयकुमार शिंदे यांच्याकडून कलम १३८ एन. आय. अ‍ॅक्ट प्रमाणे सुरेश भोरे यांनी फिर्याद कोर्टात दाखल केली. पुढे सुरेश भोरे यांनी कारखान्याचे काम सोडल्यावर फिर्यादी म्हणून संजय रामचंद्र दुबे यांनी प्रकरणात काम पाहिले. फियार्दीतर्फे संजय रामचंद्र दुबे व वसंतदादा बँकेचे मॅनेजर मुंडे यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर अ‍ॅड. विश्वजीत शिंदे यांनी केलेला अंतिम युक्तीवाद ग्रा धरून न्यायाधिश साठे यांनी आरोपी संजय महादेव माने यास तीन महिने कारावास व ५ लाख रूपये दंड आणि ५ हजार रूपये खर्च अशी शिक्षा ३० जानेवारी २०२५ रोजी सुनावली. सदर प्रकरणात शिंदे लॉ फर्म यांनी फिर्यादी जयलक्ष्मी कारखान्यातर्फे न्यायालयीन काम पाहिले. प्रकरणात अ‍ॅड. विजयकुमार शिंदे व अ‍ॅड. विश्वजीत शिंदे यांना अ‍ॅड. अजित राठोड, अ‍ॅड. भाग्यश्री रणखांब, अ‍ॅड. ज्योती जगताप व अ‍ॅड. पृथ्वीराज दंडनाईक यांच्यासह मोहरील पवन पांचळ यांनी सहकार्य केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR