नवी दिल्ल : वृत्तसंस्था
६३ वर्षांचा आयकर कायदा लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. नवीन इनकम टॅक्स बिल पुढील आठवड्यात बजेट सत्रात सादर होईल. बजेटवरील भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या बिलाचा ओझरता उल्लेख केला. त्यांनी पुढील आठवड्यात हे बिल बजेट सत्रात सादर करण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिलासाठी तज्ज्ञांची एक समिती अगोदरच गठीत केली आहे.
ही नवीन कायदा हा दोन अथवा तीन भागात असेल. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून कसरत सुरू होती. सरकार याविषयीचे बिल, विधेयक सादर करणार आहे. त्यानंतर करदाते आणि तज्ज्ञांच्या हरकती, प्रतिक्रियेनंतर त्यात सुधारणा करण्यात येईल. आता या नवीन आयकर कायद्यामुळे जुना कायदा इतिहासजमा मानण्यात येत आहे.
निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात आयकर कायदा बिल सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. आयकर कायद्याचे सुधारीत स्वरुप हे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असेल. त्याचे सरळसोपे रुपडे या नवीन आयकर कायद्याच्या रुपाने समोर आले आहे. मोदी सरकार डायरेक्ट टॅक्स कोड (डीटीसी) २०२५ सादर होईल. केंद्र सरकार आयकर कायद्यात बदल करेल. त्यांना सरळ करेल. तर व्यक्ती, संस्था, उद्योग आणि सरकारला विविध न्यायालयीन कचाट्यातून बाहेर काढण्याचे काम करेल. नाहक खटले दाखल करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.