नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प २०२५ मांडला. यावेळी त्यांनी तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने अनेक घोषणा केल्या. त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे देशात आता मेड इन इंडिया खेळणी मिळणार आहेत. खेळण्यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय योजना आणणार, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे.
संसदेत अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी स्टार्टअपसाठी १० हजार कोटींचे फंड उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच, टॉय सेक्टर म्हणजेच खेळण्याच्या क्षेत्रासाठी भारत ग्लोबल हब बनवण्यात येईल. हे खेळणे मेक इन इंडियाच्या नावाने विक्री केले जातील. खेळण्याच्या क्षेत्रासाठी एख योजना कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेंतर्गंत क्लस्टर रुम, पॉश लूम असे निर्माण करुन इको सिस्टमवर अधिक भर देण्यात येईल. जेणेकरुन याच्या निर्मितीमुळं चांगल्या गुणवत्तेचे, अनोखे आणि पर्यावरण पुरक असे खेळणी बनवण्यात येतील. हे खेळणी मेक इन इंडिया ब्रँडचे प्रतिनिधित्व करतील, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
निर्मला सीतारमण यांच्या महत्त्वाच्या घोषणा
– स्टार्ट अप्ससासाठी १० कोटीवरुन २० कोटींची क्रेडीट लिमिट
– चामड्याची पादत्राणे बनवण्यांसाठी विशेष योजना
– भारताला खेळण्यांचा क्षेत्रात ग्लोबल हब बनविणार
– पूर्वोत्तर राज्यांत अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
– वैज्ञानिक संशोधनाला चालणा देण्यासाठी वर्षांचा कार्यक्रम
– भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार