23.9 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयसुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार

शोधमोहीम सुरूच

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. शनिवारी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सकाळी ८.३० च्या सुमारास ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा कर्मचा-यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. पोलिस अधिका-याने ही माहिती दिली. गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक अजूनही सुरू आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि त्यांची विशेष युनिट कोब्राचे सैनिक या कारवाईत सहभागी आहेत. पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही कारवाई सुरू करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR