27.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeक्रीडा‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सचिनचा सन्मान

‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सचिनचा सन्मान

बुमराह, मंधानालाही मिळाले अ‍ॅवॉर्ड

मुंबई : प्रतिनिधी
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि महिला क्रिकेट संघाची अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना यांना बीसीसीआयने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून सन्मानित केले. २०२३-२४ हंगामात मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक ‘नमन पुरस्कार’ कार्यक्रमात भारतीय क्रिकेटमधील या दोन स्टार खेळाडूंना वर्षातील सर्वांत मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या दोघांव्यतिरिक्त, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमधील सर्वांत मोठा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा सुपरस्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.

बुमराह-मंधाना सर्वोत्तम क्रिकेटपटू
२००७ मध्ये, बीसीसीआयने वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला सन्मानित करण्यासाठी माजी क्रिकेटपटू दिग्गज पॉली उम्रीगर यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केला. पहिला पॉली उम्रीगर पुरस्कार महान फलंदाज सचिन तेंडुलकरला देण्यात आला. १ फेब्रुवारी २०२५ रोजी जसप्रीत बुमराहला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२३-२४ हंगामात वनडे विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी बुमराहला हा पुरस्कार मिळाला. बुमराहने हा पुरस्कार दुस-यांदा जिंकला आहे. यापूर्वी, त्याला २०१८-१९ हंगामातही हा पुरस्कार मिळाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR