इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानी सैनिक कलात जिल्ह्यात फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करणार होते. दरम्यान, ७० ते ८० बंडखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला.
या चकमकीत १२ दहशतवादीही मारले गेले. पाकिस्तानी सैनिक बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. बलुचिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत वेगवेगळ््या कारवाईत एकूण २३ दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्यासाठी बलुच लिबरेशन आर्मीला जबाबदार धरले जात आहे. मात्र, बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.