31.2 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाभारताने ४-१ मालिका जिंकली

भारताने ४-१ मालिका जिंकली

पाचवा सामना भारताने १५० धावांनी जिंकला

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला शंभरीच्या आत ऑल आउट करत मोठ्या विजयाची नोंद केली. पाहुण्या इंग्लंड संघाला १५० धावांनी पराभूत करत भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली.

अभिषेक शर्माच्या विक्रमी १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या ९७ धावांत ऑलआउट झाला. इंग्लंडची पहिली विकेट घेणा-या मोहम्मद शमीनंच इंग्लंडचा खेळ शंभरीच्या आत खल्लास केला. ही टीम इंडियासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट ठरली.

भारतीय संघाने सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने २३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. पण त्याची ही अर्धशतकी खेळी वगळता इंग्लंडच्या ताफ्यातील एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्याच्याशिवाय जेकॉब बेथल हा एकमेव फलंदाज होता ज्याने दुहेरी आकडा गाठला. तोही १० धावा करून तंबूत फिरला. बाकी सर्व फलंदाजांची धावसंख्या ही अगदी टेलिफोन नंबर दाखवणारी अशी ठरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR