32.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeक्रीडाइडीसा अंतर्गत महाराष्ट्र फार्मसीत फुटबॉल स्पर्धा

इडीसा अंतर्गत महाराष्ट्र फार्मसीत फुटबॉल स्पर्धा

निलंगा : प्रतिनिधी

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी. फार्मसी इन्स्टीट्यूट, निलंगा येथे फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्टन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. खान, प्राचार्य डॉ भागवत पौळ, डॉ. गोपाळ मोघे, डॉ. अमोल घोडके, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, मुख्याध्यापक मोहन नटवे, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, डॉ. सुनिल गरड हे उपस्थित होते.

या स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नांदेड, ग्रामीण पॉलीटेक्निक अँड मॅनेजमेंट कॅम्पस, नांदेड, राजीव गांधी पॉलीटेक्निक, उदगीर, विश्वेश्वरैया अभियंत्रिकी पदविका महाविद्यालय, अलमला, दयानंद पॉलीटेक्निक, लातूर, पुरनमल लोहोटी गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, लातूर, महाराष्ट्र फार्मसी, निलंगा या संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नांदेड आणि राजीव गांधी पॉलीटेक्निक, उदगीर यांच्यात लढत झाली. अत्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नांदेड संघाने विजेतेपद मिळविले, राजीव गांधी पॉलीटेक्निक, उदगीर हा संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी. फार्मसी इन्स्टीट्यूट यांनी केले होते . संस्थेच्या प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक व स्पर्धा संयोजक डॉ. अमोल घोडके व त्यांच्या टीमने व्यवस्थापन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विलास कारभारी, मुळदकर डॉ. सी. व्ही. ठाकरे, एन. जी. माने, रमाकांत मादळे, गणेश पवार, गजानन माने, प्रेम मुळे विशाल गिरी, गणेश पवार , रमाकांत मांदळे आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे संचलन डॉ. एस. एस. दुधमल यांनी केले तर सामना निरीक्षक वाय. यस. कटके तर रेफरी म्हणून शेख निजाम, हाश्मी सय्यद इमाम, शेख रहमत आणि सय्यद अलीम यांनी भूमिका बजावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR