23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे अजितदादांच्या भेटीला; दमानिया यांनी बॉम्ब टाकताच मोठी घडामोड

धनंजय मुंडे अजितदादांच्या भेटीला; दमानिया यांनी बॉम्ब टाकताच मोठी घडामोड

बीड : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. दमानिया यांनी तब्बल ८०० कोटींचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार उघड केला. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी वर्षभरातच ८०० कोटींचा कृषी खरेदीचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही केली. मुंडे यांचा भगवान गडानेही पाठिंबा काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कॅबिनेटआधीच भेट
दमानिया यांची पत्रकार परिषद होताच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत अंजली दमानिया यांच्या आरोपावरून चर्चा होण्याची शक्यताही आहे. त्यापूर्वीच मुंडे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR