20 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले

वर्धा : पुण्याहून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी भाविक सकाळी मार्गस्थ झाले होते. यासाठी खासगी बस बुकिंग करून पहाटे निघालेल्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून समोर येणा-या ट्रकचालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होत लोखंडी बॅरिगेड तोडून थेट ट्रॅव्हल्सवर जाऊन धडकला. यात दोन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत.

विरुळ परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर सदरचा अपघात पहाटे ४.३० च्या सुमारास नागपूर कॉरिडॉर परिसरात झाला. ट्रकचालक लव शर्मा, क्लीनर रणजित विश्वकर्मा (रा. छतरपूर, झारखंड) हे ट्रकमध्ये लोखंडी अँगल भरून नागपूरकडून मुंबईकडे जात होते. धावत्या ट्रकमध्ये ट्रकचालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गालगतचे लोखंडी बॅरिगेड तोडून ट्रक थेट नागपूर कॉरिडॉरवर गेला.

भाविकांच्या गाडीला धडक
हा ट्रक थेट प्रयागराजकडे जाणा-या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळला. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ प्रवासी होते. ते सर्व प्रयागराज येथे जात होते. अपघातात ट्रॅव्हल्सचालक रफिक खान (वय ३५) व क्लीनर रणजित विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ समृद्धीवरील रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले लोखंडी पाईप देखील बाजूला करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR