लातूर : सिध्देश्वर दाताळ
राज्य परिवहन महामंडळाने गेल्या आठ दिवसापुर्वी एसटी प्रवासाच्या तिकरटत वाड केली असून भाडेवाढीमुळे सुटया पैशांवरून वाद होण्याची लक्षणे असताना एसटी महामंडळानी तिकीट खरेदीसाठी यूपीआयचा पर्याय निवडला असल्याने हा पर्याय प्रवाशी वर्गाला सोयीचा ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तिकीट वाढ झाल्याने प्रवाशी वर्गाने यूपीआय तिकिट विक्रीतून लातूर विभागाला तब्बल १ कोटी ७९ लाख ७ हजार ०७२ रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. भाडेवाढीनंतर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीत दुपटीने वाढ झाली असल्याचे लातूर विभाग प्रमुख विश्वजित जानराव यांनी सागीतले.
एकीकडे एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १ रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्यात आल्याने सुटया पैशांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाकडून वाहकाकडे १०० रुपयांची चिल्लर अॅडव्हान्स देण्यात येत आहे. त्याबरोबरच यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे देऊन तिकीट घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्याला लातूर विभागातील पाचही आगारातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तसेच एसटी भाडेवाढ झाल्यापासून यूपीआयच्या माध्यमातून मिळणा-या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंट ची सुविधा उपलब्ध करून दिली. वाहकाच्या अॅड्राईड तिकीट मशीन वर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुटया पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले असल्याचे तरी दिसून येत आहेत.