18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनअभिनेते दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड

अभिनेते दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड

मुंबई : ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

दिनेश फडणीस यांचा जन्म २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये दिनेश यांची गणना होते. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम केले आहे. या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. फ्रेड्रिक्सची भूमिका साकारण्यासह त्यांनी या मालिकेचे कथानकही लिहिले आहे.

दिनेश फडणीस यांनी छोटा पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडदादेखील गाजवला आहे. ‘सरफरोश’ आणि ‘सुपर ३०’ या सिनेमात ते झळकले आहेत. तसेच एका मराठी सिनेमाचे लेखन त्यांनी केले आहे. छोट्या पडद्यावरील ‘सीआयडी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत त्यांनी काम केले आहे. १९९८ ते २०१८ मध्ये ‘सीआयडी’ या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली. २००५ मध्ये आलेल्या ‘सीआयडी : विशेष ब्यूरो’ या भागात ते सब इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्सच्या भूमिकेत होते. त्यानंतर ‘अदालत’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारली आहे. ‘सीआयएफ’ या मालिकेत ते कॉन्स्टेबल शंभू तावडेच्या भूमिकेत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR