23.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रकरुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ

करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ

मुंबई : माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असे विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले आहे. त्यामुळे आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा वडिलांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीनंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले. मात्र आता करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

वडील आईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्यासोबत तसे वागले नाहीत असे सिशिव मुंडेने म्हटले आहे. सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला आहे. त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

‘मी सिशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलणे महत्त्वाचे वाटते कारण मीडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहे. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचवणारे नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिले आणि तेथून जाण्यास सांगितले. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही, असे सिशिवने स्पष्ट केले आहे.

२०२० पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहेत आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझी आई काही ना काही बहाणे बनवत राहते. माझ्या आईने घरावरचे कर्जसुद्धा फेडलेले नाही. आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे’ असेही सिशिवने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR