प्रयागराज : महाकुंभमेळा परिसरात पुन्हा आग लागली आहे. जत्रेदरम्यान शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-१८ मध्ये अनेक मंडप जळाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गर्दीला घटनास्थळावरून हटवले जात आहे. सर्वत्र बॅरिकेडिंग केले जात आहे. मात्र, आगीमागील कारण काय होते. ते अद्याप साफ झालेले नाही. यापूर्वी १९ जानेवारी रोजी आग लागली होती. त्यावेळी गीता प्रेसच्या १८० तंबू जळून गेले होते.