24.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत औद्योगिक इकोसिस्टीम होणार

गडचिरोलीत औद्योगिक इकोसिस्टीम होणार

गडचिरोली : प्रतिनिधी
देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) दिली. विदर्भाच्­या मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट समिट ‘ऍडव्हान्टेज विदर्भ २०२५ – खासदार औद्योगिक महोत्सव’ चे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्­ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात हा सोहळा झाला.

मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या ‘स्टील रेवोल्युशन’चा फायदा नजीकच्या सर्व जिल्ह्यांना होईल. वर्धन लिथियमच्या ४२,००० कोटींच्या सामंजस्­य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत आहे. ‘कॉटन टू फॅशन’ अशी परिपूर्ण इकोसिस्टीम अमरावतीमध्ये पीएम मित्र पार्कच्या माध्यमातून तयार होत आहे.

संरक्षण विषयक उत्पादनात लागणा-या कापसाच्या उपयोगितेबद्दल देखील त्यांनी संभाव्य इकोसिस्टीमबद्दल चर्चा केली. एव्हिएशनच्या क्षेत्रात नागपूर एअरपोर्टचा विकास करून इमिग्रेशन आणि बॅगेज हॅण्डलिंगची सुविधा कशी आणता येईल, याबद्दल चर्चा सुरू असल्यावर भर दिला. यासोबतच बुटीबोरीमध्ये ईव्ही ऑपरेटरचा एमओयू करणार असून १० हजार युवकांना ईव्ही ऑपरेटर्सच्या रूपाने ट्रेनिंग देऊन रोजगार देण्यात येईल, असेही सांगितले. तेलंगना आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून पोर्ट जोडण्याच्या दृष्टीने दावोसमध्ये चर्चा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, एचसीएलच्या रोशनी नडार मल्होत्रा यांनी नागपूरला ‘फायनान्शिअल हब फॉर एआय’ मध्ये परिवर्तित करण्याचा मानस व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR