31.6 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीत ‘आप’ला धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत

दिल्लीत ‘आप’ला धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथे ‘आप’ला मोठा हादरला बसला असून तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे. लक्षवेधी ठरलल्या नवी दिल्ली मतदासरंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.

राजधानी दिल्लीत आज (दि. ८) सकाळी कडक सुरक्षेत मतमोजणीला प्रारंभ झाला होता. ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५ फेब्रुवारी रोजी १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर एकूण ६०.५४ टक्के मतदान झाले होते.

नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या ८ फे-यांनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्या १३ फे-यांपैकी दहाव्या फेरीत केजरीवाल हे १८४४ मतांनी पिछाडीवर होते. अखेर मतमोजणीच्या ८ फे-यांनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचा विजय झाला.

अरविंद केजरीवाल यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत नवी दिल्­ली मतदारसंघात तत्­कालीन मुख्­यमंत्री शीला दीक्षित पराभव केला होता. यानंतर त्­यांनी तीन वेळा या विधानसभा मतदारसंघातचे प्रतिनिधित्व केले होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR