25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्र‘शक्तिपीठ’ महामार्गाचा मुद्दा पेटला‘शक्तिपीठ’ महामार्गाचा मुद्दा पेटला

‘शक्तिपीठ’ महामार्गाचा मुद्दा पेटला‘शक्तिपीठ’ महामार्गाचा मुद्दा पेटला

मुख्यमंत्री फडणवीसांना रक्ताने लिहिलेली पत्रं पाठवली

कोल्हापूर : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक विरोध होत आहे. जिल्ह्याच्या १५ गावांतून जाणा-या शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ ग्रामपंचायतींनी थेट ग्रामसभा घेत महामार्ग रद्दचा ठराव केला आहे. पण हा विरोध डावलून तो रेटण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत.

यामुळे सांगलवाडीतील शेतक-यांनी आपल्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहीत ती मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. तसेच हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी करत आहेत. मात्र राज्यातील महायुती सरकारने तो पुढे सरकवला आहे. तर या महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. तशी कबुली सर्व आमदारांनी दिल्याचे फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते.

यामुळे मागणी नसताना ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट महायुती घालत असल्याचा दावा आता शेतकरी करत आहेत. तसेच शक्­ितपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव देखील करण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील शेतक-यांनी घेतली आहे.

आपल्या मागणीसाठी सांगलीवाडीतील शेतक-यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. सांगलीवाडीतील राममंदिर चौकात बाधित शेतक-यांनी एकत्र येत बाटलीत रक्त काढून बोरूने मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहीली आहेत. या पोस्ट कार्डवर बाधित शेतक-यांनी, माझी जमीन बागायती असून, महामार्गासाठी द्यायची नाही.

या महामार्गामुळे या परिसराला महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावीत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान नांदेड येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शक्­ितपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे सांगून शक्तिपीठला विरोध करणा-या शेतक-यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच, मी सर्व आमदारांशी चर्चा केली असून यात सांगलीचे आमदार-खासदारांचा समावेश होता. या सर्वांनी महामार्गाला कोणताच विरोध नसल्याचे सांगितले आहे.

पण सांगलीत झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनात आमदार-खासदारांचा समावेश होता. त्यांना फडणवीस यांनी विचारले का? ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय? जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त सवाल आता शेतक-यांच्या मनात घोळत असून असंतोष वाढत आहे.

यामुळेच मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहीण्याचे आवाहन बाधित शेतक-यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतक-यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहीली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR